Thursday, July 18, 2024 10:18:52 PM

अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा

अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अभिनेत्री पूजा सावंत हिचे लाखो चाहते आहेत. ती चित्रपटांसोबतच समाज माध्यमांवर देखील सक्रिय असते त्यामुळे तिचे चाहते नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याशी देखील जोडलेले असतात. अशातच आता पूजाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत फोटो सामायिक केले आहेत.

अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या सोशल मीडियावर तिने साखरपुडा केला असल्याचे सांगितले आहे. परंतू पूजाच्या आयुष्यातील हा स्पेशल व्यक्ती आहे तरी कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. पूजाने इंस्टाग्रामवर तीन फोटो पोस्ट केलेत. या तिनही फोटोत पूजा एका तरुणाच्या मिठीत असुन त्याचा चेहरा दिसत नाहीय आणि या पोस्टला We Are Engaged (आमचा साखरपुडा झालाय) असं लिहील्याने पूजाने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलंय. आता पूजाचा होणार नवरा कोण याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)


सम्बन्धित सामग्री