Tuesday, January 14, 2025 04:30:33 AM

कुणीतरी येणार येणार गं!

कुणीतरी येणार येणार गं

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमचा आर्टिकल ३७० हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमामध्ये यामीचा पती आदित्य धर यानं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यामी ही आई होणार आहे, असं यामीचा पती आदित्य धरनं सांगितलं. आदित्यनं ही गुडन्यूज दिल्यानंतर आता यामी आणि आदित्य यांच्यावर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आर्टिकल ३७० या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान यामी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. आर्टिकल ३७० च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान आदित्य म्हणाला, 'बाळ लवकरच येणार आहे' आता यामीच्या प्रेग्नेंसीची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या लग्नाला ३ वर्ष झाली आहेत. दोघांनी २०२१ मध्ये लग्न केले. यामी आणि आदित्य यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आदित्यनं दिग्दर्शित केलेल्या उरी या चित्रपटात यामीनं काम केलं. यामी गौतमनं २०१२ मध्ये रिलीज झालेल्या विक्की डोनर या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामी गौतमचा ओएमजी २ हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला.


सम्बन्धित सामग्री