Thursday, July 18, 2024 09:58:52 PM

'या' सहाजणी ठरल्या पुरस्काराच्या मानकरी

या सहाजणी ठरल्या पुरस्काराच्या मानकरी

प्रतिनिधी, मुंबई, दि. ६ मार्च २०२४ : झी गौरव पुरस्कार, कलाकाराच्या ओळखीचे आणि प्रत्येक कलाकाराला हवेहवेसे वाटणारे यश शिखर. असा पुरस्कार ज्यात उत्कृष्टतेचा सातत्याने सन्मान केला जातो. चित्रपटात मेहनत करून नामांकन मिळणं म्हणजे आपल्या कामाची कोणीतरी दखल घेतंय आणि आपलं नाव एखाद्या पुरस्कारासाठी घोषित होऊन पुरस्कार मिळणं म्हणजे केलेल्या मेहनतीचं सार्थक होणं. अशा असंख्य भावना प्रत्येक कलाकाराच्या मानत जागृत होत असतात.

या वर्षीच्या झी गौरव पुरस्काराने या कार्यक्रमात एक वेगळेच वळण आणले आणि या कार्यक्रमात आणखीनच भर पडली. यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणा एका अभिनेत्रीला देण्यात आला नसून हा पुरस्कार सहा अभिनेत्रींना देण्यात आला आहे. यावेळी प्रत्येक पुरस्कार प्राप्तकर्त्याला एक ट्रॉफी दिली गेली.

पुरस्काराच्या मानकरी ठरणाऱ्या या सहाजणी कोण ?

या सहाजणी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून "बाई पण भरी देवा" या चित्रपटामधील भूमिकांसाठी ज्या अभिनेत्रींना संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतले अशा सुप्रसिद्ध असलेल्या सहा अभिनेत्री. म्हणजेच सुकन्या मोने, दीप परब, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगडी,सुचित्रा बांदेकर यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी यावर्षीच्या झी गौरव अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सुकन्या मोने यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती शेअर करून सर्वांना धन्यवाद दिले आणि यासोबतच एक खास फोटो शेअर केला. त्यांच्या यशात अनेकांचा वाट असल्याचेही त्यांनी सांगितले आणि त्यांना मिळालेल्या प्रेम आणि आशीर्वादांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


सम्बन्धित सामग्री