मुंबई , ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारतीय अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या चर्चेत आहे. क्रांती रेडकर ही दिग्दर्शिका आणि निर्माती आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगात तिच्या कामासाठी ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये तिच्या बहुमुखी अभिनयासाठी ओळख मिळवली आहे. रेडकर यांनी ‘काकण’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले असून विविध समाजकारणात त्यांचा सहभाग आहे. ती तिच्या प्रतिभा आणि मराठी मनोरंजनातील योगदानासाठी प्रसिद्ध आहेच त्यासोबतच क्रांती तिच्या चाहत्यांसाठी समाज माध्यमांद्वारे वेगवेगळे खास क्षण शेअर करत असते.
क्रांतीने सिने इंडस्ट्रीतल्या वर्णभेदावर आपले विचार मांडून हा मुद्दा आणखी पारदर्शक केला आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये केले जाणारे वर्णभेद ही काही नवीन चर्चा करण्याची गोष्ट नाही. कित्येक वर्षांपासून ह्या मुद्यांवर चर्चा होत आहे. अनेक कलाकारांनी आपले अनुभव मांडून याबद्दल व्यक्त झाले आहेत. आणि याचबरोबर अभिनेत्री क्रांती रेडकर सुद्धा या मुद्द्यावर व्यक्त झाली आहे. आजही सिनेइंडस्ट्रीत श्रीमंती दाखवायची असेल तर गोरा रंग आणि गरिबी दाखवण्यासाठी सावळ्या रंगाचाच विचार केला केला जातो, असं क्रांती म्हणाली.
क्रांती रेडकरने केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वर्णभेदाचा हा मुद्दा चर्चेत आला आहे. क्रांतीला लोकमत फिल्मीमध्ये घेतलेल्या मुलाखीत इंडस्ट्रीत चेहऱ्याच्या रंगामुळे होणाऱ्या भेदभावाबद्दल विचारण्यात आले तेव्हा क्रांती बोलत होती., याचं तिनं दिलेलं उत्तर सध्या चांगलंच चर्चेत आलंय
क्रांती मुलाखतीत काय म्हणाली ?
क्रांती ने उत्तर दिले की , ' या सगळ्यात बदल यायला हवा पण यासाठी अनेकदा समाज माध्यम तसंच स्वत: सिनेइंडस्ट्री देखील तितकीच जबाबदार आहे. श्रीमंत मुलगी ही गोरीच असायला हवी. गरीब किंवा मोलकरणीची भूमिका असेल तर ती काळी, सावळी हे असेच सुरू आहे. हे सगळं बदलत नाही तोपर्यंत आपण या क्षेत्रात प्रगती करू शकणार नाही. दुदरदर्शन मालिका, सिनेमांमुळेच लोकांचे विचार बदलतात. त्यामुळे आधी इंडस्ट्रीतल्या या गोष्टी बदलायला हव्यात, असे क्रांती मुलाखतीत म्हणाली. त्याचबरोबर क्रांतीने नुकतीच ‘वन डे’ नावाची वेब सीरिज पाहिली, असं म्हणत इंग्रजी वेब सीरिजचा दाखला देत हॉलिवूडमध्येही सध्या एशियन ब्यूटीला महत्त्व असल्याचं सांगितलं. असं नाही की, गोऱ्या मुलांना वाईट लेखा.त्या सुंदरच आहेत. पण सावळ्या मुलीही सुंदरच असतात. आपणच या सगळ्या गोष्टी बदलायला हव्यात, असं ती म्हणत आपले विचार मांडत होती.