Saturday, June 15, 2024 03:14:39 PM

जागतिक पुस्तक दिनी अभिनेत्री शिवानी रांगोळेने केलं स्वतःच पुस्तक प्रकाशित !

जागतिक पुस्तक दिनी अभिनेत्री शिवानी रांगोळेने केलं स्वतःच पुस्तक प्रकाशित

मुंबई, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अनेक मालिकांमध्ये काम करून स्वत:ची ओळख निर्माण करणारी " सांग तू आहेस का', 'आम्ही दोघी', 'बन मस्का' अशा मालिकांमध्ये ती मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे! सध्या शिवानी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अनेक सिनेमात काम करून शिवानी ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवानी तिच्या मालिकेत व्यस्त असून सुद्धां तिने आज प्रेक्षकांना गूड न्यूज दिली आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

शूटिंग मध्ये व्यस्त असून सुद्धा शिवानी अनेकदा वाचनाला प्राधान्य देत असते आणि तिच्या व्यस्त गडबडी मधून वेळ काढून पुस्तक वाचते. आता पुस्तक वाचणारी ही शिवानी स्वतःहा लेखिका बनली आहे. " कॉफी, रेन्स अँड टुमारो " या पुस्तकाचं ऑनलाईन लाँच करून आजच्या पुस्तकं दिनाचं औचित्य साधून तिने हे पुस्तक लाँच केलं आहे. शिवानी अभिनयाच्या सोबतीन आता लेखिका सुद्धा बनली आहे.

" कॉफी, रेन्स अँड टुमारो " हे पुस्तक शिवानीच्या फार जवळच आहे. पुस्तकाबद्दल बोलताना शिवानी सांगते " शूटिंग मधून वेळ काढून पुस्तक लिहीन आन आजच्या दिवशी ते लाँच करण हा दिवस माझ्यासाठी नक्कीच खूप खास आहे. वाचनाची आवड असताना पुस्तक वाचण आणि आता स्वतःच पुस्तक लिहून ते लाँच करण हा क्षण खूप आनंदाचा आहे. आता अभिनयाच्या सोबतीने लेखिका होणं ही जवाबदारी नक्कीच मोठी आहे "

शिवानी सध्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असून आता लेखिका बनून ती पुन्हा प्रेक्षकांना आपलंसं करणार आहे.


सम्बन्धित सामग्री