नवी दिल्ली, १ मे २०२४, प्रतिनिधी : सुपरसॉनिक मिसाइल-असिस्टेड रिलीझ ऑफ टॉर्पेडो (SMART) प्रणालीची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. 'स्मार्ट' ही भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी लढण्याची क्षमता हलक्या वजनाच्या टॉर्पेडोच्या पारंपारिक मर्यादेपलीकडे वाढवण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. चाचणीवेळी 'स्मार्ट' जमिनीवरील मोबाईल लाँचरवरून सोडण्यात आले. 'स्मार्ट'च्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले.