Friday, May 24, 2024 09:39:04 AM

कर्नाटकात दहावीचा निकाल गुरुवारी होणार जाहीर

कर्नाटकात दहावीचा निकाल गुरुवारी होणार जाहीर

बेळगाव, ८ मे २०२४, प्रतिनिधी :  दहावीचा निकाल गुरुवारी (ता. ९) जाहीर केला जाणार आहे अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. मार्च-एप्रिल महिन्यांत झालेल्या दहावी परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आले होते. तसेच पेपर तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर निकाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सुरुवातीला आठ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, शिक्षक निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाल्यामुळे एक दिवस विलंबाने निकाल जाहीर केला जाणार आहे.

                 

सम्बन्धित सामग्री