Friday, May 24, 2024 09:15:11 AM

चारधाम यात्रा सुरू

चारधाम यात्रा सुरू

केदारनाथ, १० मे २०२४, प्रतिनिधी : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील चारधामची यात्रा सुरू झाली आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत केदारनाथ मंदिराचे प्रवेशद्वार भाविकांसाठी खुले करण्यात आले. गंगोत्रीचे दर्शन सकाळी साडेदहा वाजल्यापासून तर यमुनोत्रीचे दर्शन दुपारी १२ वाजून २५ मिनिटांपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. बद्रिनाथ मंदिराचे प्रवेशद्वार रविवार १२ मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांसाठी खुले होणार आहे. उत्तराखंडच्या अनेक भागात १० ते १३ मे दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पण १४ आणि १५ मे रोजी उत्तराखंडमध्ये निरभ्र आकाश असेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


सम्बन्धित सामग्री