Saturday, June 15, 2024 04:36:59 PM

Congress vs NCP
काँग्रेसच्या निशाण्यावर अजित पवार ?

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुण्यातील पोर्शे अपघातावर पक्षाच्यावतीने भाष्य केले.

काँग्रेसच्या निशाण्यावर अजित पवार

मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुण्यातील पोर्शे अपघातावर पक्षाच्यावतीने भाष्य केले. पुण्याच्या अपघात प्रकरणात सीबीआय चौकशी व्हायला हवी अशी मागणी नाना पटोले यांनी काँग्रेसच्यावतीने केली. काँग्रेसच्या या मागणीमागे राजकारण दडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

काँग्रेसने सीबीआय चौकशीची मागणी करण्यामागे काय राजकारण आहे ?

वेदांत अगरवालकडून अपघात घडल्यापासून अजित पवार बॅकफूटवर
वेदांतचा बाप तसेच आरोपी विशाल अगरवाल हा राष्ट्रवादीचा आमदार सुनील टिंगरेचा निकटवर्तीय
आमदार सुनील टिंगरे हा अजित पवारांचा कट्टर समर्थक 
काँग्रेसकडून प्रथम आमदार सुनील टिंगरे निशाण्यावर. 
अपघाताच्या वेळी आमदार पुत्र गाडीत - पटोले 
टिंगरे पाठोपाठ अजित पवार समर्थक हसन मुश्रीफ यांच्यावर काँग्रेसचा निशाणा
काँग्रेसकडून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याभोवती संशयाचं धुकं वाढवायचा प्रयत्न
अजित पवार यांच्याकडून आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा काँग्रेसी आक्षेप
अजित पवारांनी मात्र काँग्रेसचे आक्षेप फेटाळले. 


सम्बन्धित सामग्री