Saturday, June 15, 2024 04:13:21 PM

Ajit Pawar
'मी नार्को चाचणी करायला तयार, पण...'

अजित पवार यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

मी नार्को चाचणी करायला तयार पण 

पुणे : पुण्याच्या पोर्शे अपघात प्रकरणात अजित पवार यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. मी नार्को चाचणी करायला तयार आहे पण या चाचणीत काही निघाले नाही तर त्यांनी पुढे काही बोलायचे नाही. माध्यमांपुढे न येता गप्प घरीच बसून राहायचे, त्यांनी संन्यास घ्यायचा. त्यांना चालणार आहे का ? या शब्दात अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना आव्हान दिले.


सम्बन्धित सामग्री