मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे युनिटन तब्बल सव्वा कोटींची अवैध दारू पकडली आहे. उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या सुमारे ८४ हजार बॉटल्स जप्त केल्या आहेत. हा माल एका ट्रकमधून अवैध मार्गाने महाराष्ट्रात दाखल झाला होता. जालन्याच्या दिशेने निघालेला हा ट्रक खेड शिवापुर टोल नाक्यावर पकडण्यात आला. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.