Saturday, July 20, 2024 01:03:24 PM

Parliament Session
संसदेचे पहिले अधिवेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

संसदेचे पहिले अधिवेशन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. नवी दिल्लीत अठराव्या लोकसभेचे कामकाज २४ जूनपासून सुरू होईल आणि ३ जुलैपर्यंत चालेल. राज्यसभेच्या २६४ व्या सत्राचे कामकाज २७ जूनपासून सुरू होईल आणि ३ जुलैपर्यंत चालेल. लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात नव्या सदस्यांच्या शपथविधीने होईल. शपथविधीनंतर लोकसभेच्या नव्या सभापतींची निवड केली जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे २७ जून रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून अभिभाषण होईल. यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये अभिभाषणावर चर्चा होईल. पंतप्रधान मोदी दोन्ही सभागृहांमध्ये मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचा परिचय करून देतील.


सम्बन्धित सामग्री