Saturday, July 20, 2024 12:49:03 PM

Marathwada was shaken by earthquake shocks
भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरला

मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले आहेत.

भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरला

हिंगोली : मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे ७.१४ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले असून हिंगोली जिल्ह्यात सर्व दूर हा भूकंप जाणवला आहे. परभणी जिल्ह्यातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. परभणीतील सेलू गंगाखेड आदी भागात जाणवला. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन घराबाहेर आले. या घटनेमुळे नागरिकांध्ये भीताचे वातावरण निर्माण झाले आहे.


सम्बन्धित सामग्री