Thursday, July 10, 2025 04:12:47 AM

मनसे विधानसभा लढवणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांची पुन्हा एकदा चार वर्षांसाठी मनसेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

मनसे विधानसभा लढवणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांची पुन्हा एकदा चार वर्षांसाठी मनसेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. शिस्तभंग आणि इतर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकारही राज ठाकरे यांनाच देण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसेने विधानसभेच्या दोनशे ते अडीचशे जागा लढवण्याच्या मुद्यावर चर्चा केली. विधानसभा लढवण्यासाठी चाचपणी करा आणि तयारी सुरू करा, असे निर्देश पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. 


सम्बन्धित सामग्री