Thursday, December 05, 2024 05:52:56 AM

Shahrukh Khan
कलाकार शाहरुख खान रुग्णालयात

आयपीएलमधील क्वालिफायर सामन्याच्या निमित्ताने कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंसोबत अहमदाबादमध्ये आलेल्या शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झाला.

कलाकार शाहरुख खान रुग्णालयात

अहमदाबाद : आयपीएलमधील क्वालिफायर सामन्याच्या निमित्ताने कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंसोबत अहमदाबादमध्ये आलेल्या शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झाला. तब्येत बिघडल्यामुळे शाहरुखला अहमदाबाद येथील केडी रुग्णालयात दाखल केले आहे. शाहरुखच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जुही चावला आणि जुहीचा पती जय मेहता केडी रुग्णालयात गेले होते. 

शाहरुखवर उपचार सुरू आहेत. तब्येतीत अपेक्षित सुधारणा होईपर्यंत त्याला घरी जाण्याची परवानगी मिळणार नाही, अशी मोघम माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. 

आयपीएलच्या क्वालिफायर १ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना आठ गडी राखून जिंकला. या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. आता कोलकाता नाईट रायडर्स रविवार २६ मे रोजी अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू होईल.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo