Saturday, June 15, 2024 05:28:00 PM

Terrorist Attack
मोदी सरकारच्या शपथविधीवेळी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

दिल्लीत मोदी सरकारचा शपथविधी सुरू असताना जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाला.

मोदी सरकारच्या शपथविधीवेळी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

रियासी : दिल्लीत मोदी सरकारचा शपथविधी सुरू असताना जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी बसला लक्ष्य करून गोळीबार केला. चालकाला गोळी लागली आणि त्याने बसवरील नियंत्रण गमावले. बस दरीत कोसळली. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले. या घटनेनंतर थोड्याच वेळात काँग्रेस नेत्यांनी ट्वीट करून घटनेविषयी दुःख व्यक्त केले आणि दहशतवाद्यांच्या कारवाईचा निषेध केला. 


सम्बन्धित सामग्री