मुंबई, २० मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील तेरा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. हे मतदान सुरू असतानाच शिउबाठाने रडारड सुरू केली आहे. मतदान संथगतीने सुरू आहे... निवडणूक अधिकारी मुद्दाम दिरंगाई करत आहेत... अशा स्वरुपाचे आरोप उद्धव यांच्याकडून करण्यात आले. ज्यांच्यामुळे दिरंगाई होत आहे त्या अधिकाऱ्यांची नावं कळवा न्यायालयात दाद मागणे सोपे होईल, असेही उद्धव म्हणाले. नागरिकांनी कितीही उशीर झाला तरी मतदान करावे, असे आवाहन उद्धव यांनी उद्धव यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून टीका करण्यात आली. अभ्यास करून बोला, असे खडे बोल भाजपाने उद्धव यांना सुनावले.