Saturday, July 27, 2024 10:54:10 AM

vijaykumar gavit voting
विजयकुमार गावित यांनी केले मतदान

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत.

विजयकुमार गावित यांनी केले मतदान
vijaykumar gavit voting

नंदुरबार, १३ मे २०२४, प्रतिनिधी :  राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत. 
मंत्री विजयकुमार गावित यांचे मूळ गाव असलेल्या नटावद या गावी त्यांनी मतदान केले आहे. विजयकुमार गावित यांचे कुळदैवत असलेल्या देव मोगरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर मंत्री विजयकुमार गावित यांनी मतदान केलं. 'प्रत्येक नागरिकांनी मतदान करावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे. विजय कुमार गावित यांची मुलगी डॉ.हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उभ्या आहेत. हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसचे गोपाल पाडवी अंडी वंचितचे हनुमंत सूर्यवंशी उभे आहेत. 
सोमवारी, १३ मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे.


सम्बन्धित सामग्री