Saturday, November 09, 2024 01:22:10 PM

दारूचा प्रत्येक थेंब करतो नुकसान, लिव्हर किती खराब झालंय हे घरीच तपासा

दारूचा प्रत्येक थेंब करतो नुकसान लिव्हर किती खराब झालंय हे घरीच तपासा

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आड दारू पित नाहीत अशी व्यक्ती भेटणं खूपच कमी झाले आहे. आजकाल दारूचे सेवन हा आज लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. तर अतिरिक्त अल्कोहोलने शरीरीला त्रासच होतो. याचा थेट परिणाम लिव्हरवर होतो. लिव्हरसंबंधित अनेक आजार आहेत जे जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे होतात. यापैकी पहिला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, दुसरा अल्कोहोलिक हेपेटायटीस आणि तिसरा अल्कोहोलिक सिरोसिस आहे.

लिव्हरशी संबंधित हे तिन्ही आजार तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. याशिवाय लिव्हरला सूज येणे ज्याला एआरएलडी असेही म्हणतात. अशा वेळी तुम्ही जास्त दारू प्यायल्यास आणि त्यामुळे तुमच्या लिव्हरवर परिणाम झाला आहे की नाही, यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. अल्कोहोलमुळे होणाऱ्या या लिव्हरच्या आजारांची काही प्रारंभिक लक्षणे आहेत. हे समजून घेऊन तुम्ही तुमचे यकृत खराब होण्यापासून वाचवू शकता. या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

यकृतामध्ये सूज येऊ शकते

जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घ कालावधीसाठी मोठ्या प्रमाणात अल्कोहोल घेते तेव्हा यकृतामध्ये जळजळ होऊ शकते. यकृताची जळजळ हे एआरएलडीचे एक सामान्य लक्षण आहे, जे अनेक मद्यपींमध्ये आढळते. हे नंतर सिरोसिसमध्ये बदलते, यकृताची सर्वात धोकादायक समस्या.

​व्यायामाशिवाय वजन कमी होऊ लागते

तुम्ही जास्त दारू प्यायल्यास त्याचा तुमच्या भूकेवर नक्कीच परिणाम होतो. तसेच, यामुळे तुमचे वजनही झपाट्याने कमी होऊ शकते. हे तुमच्यासोबत होत असेल तर हलके घेऊ नका. याशिवाय शरीरात अचानक होणारे कोणतेही बदल यकृताच्या आजाराशी संबंधित असू शकतात.

भूक कमी होते

जर तुम्ही जास्त प्रमाणात अल्कोहोल घेत असाल तर त्यामुळे तुमची भूक कमी होण्याची शक्यता आहे. जर तुमच्या बाबतीत असे होत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे यकृताच्या आजाराचे लक्षण आहे. याशिवाय, भूक न लागल्यामुळे, शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असू शकते ज्यामुळे पेशींना देखील नुकसान होऊ शकते.

     

सम्बन्धित सामग्री




jaimaharashtranews-logo