Saturday, June 15, 2024 05:20:11 PM

Jalana Accident
१ ठार १६ जखमी जालना मार्गावर भीषण अपघात

जालना मार्गावर असलेल्या कुंभेफळ चौकात घडलेली धक्कादायक घटना, कुंभेफळ चौकात बसने मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक देऊन ...

१ ठार १६ जखमी जालना मार्गावर भीषण अपघात

जालना, ३ जून २०२४, प्रतिनिधी : जालना मार्गावर असलेल्या कुंभेफळ चौकात घडलेली धक्कादायक घटना, कुंभेफळ चौकात बसने मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक देऊन भीषण अपघात जालना मार्गावर झाला आज. ही घटना पाहटे साडेतीन वाजेच्या सुमारास  घडली असून, या अपघातात १ जण ठार तर १६ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळतेय. या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना मिळत असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविले व आता जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सम्बन्धित सामग्री