Saturday, June 15, 2024 04:08:27 PM

... and the municipal corporation woke up
... आणि महापालिकेला आली जाग

मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून निष्पाप १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन खडबडून जागी झाल्याचं पहायला मिळत आहे.

 आणि महापालिकेला आली जाग 

छत्रपती संभाजीनगर, १६ मे, २०२४ : मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून निष्पाप १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन खडबडून जागी झाल्याचं पहायला मिळत आहे. महापालिकेने होर्डिंग संदर्भात कारवाई करण्याच्या दृष्टीने आता तयारी सुरू केली आहे. शहरातील सर्व होर्डिंग्स आणि ज्या इमारतीवर होर्डिंग लावले आहेत त्या इमारतीचेही स्ट्रक्चरल ऑडिट करा, असे सक्त आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरात ४२० होर्डिंग आहेत. महापालिका प्रशासनाने गेल्या २१ वर्षात एकदाही याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे घाटकोपरची पुनरावृत्ती टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने होर्डिंगच्या एजन्सी धारकांना 'आठ दिवसात अहवाल सादर करा, अन्यथा कायदेशीर कारवाईला समोर जा', अशी सक्त ताकीद दिली  आहे. शहरातील सेवन हिल, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप आणि सिडको परिसरात हे ४१० अधीकृत होर्डिंग लागलेले आहे. यामधील ९० टक्के होर्डिंग धोकादायक असून त्यांची मुदत ३१ मार्च पर्यंतच होती. मात्र, मनपाने नोटीस बजावूनही संबंधित एजन्सीने स्ट्रक्चरल ऑडिटला ठेंगा दाखवलाय. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये शहरात वादळी वाऱ्यासह अधूनमधून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने एखादी अप्रिय घटना होण्याचाही धोका नाकारता येत नाही.


सम्बन्धित सामग्री