रायगड : माथेरान दस्तुरी नाका वाहनतळ येथील पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना आता येथील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वीकेंडला पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होत असल्याने येथील स्थानिक टॅक्सी चालक-मालक संघटना आक्रमक झाली होती. या पार्किंग व्यवस्थेविरोधात टॅक्सी संघटनेने शनिवारी वाहन बंद आंदोलन पुकारले होते. परिणामी पुन्हा माथेरान घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर वन विभागाशी बोलणे करून नेरळ माथेरान पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.