मुंबई, १६ मे २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे उद्धव ठाकरे गुरुवारी ठाणे आणि कल्याणमध्ये सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठीचे माविआचे उमेदवार राजन विचारे आणि वैशाली दरेकरा यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.
बुधवारी उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. यानंतर, गुरुवारी उद्धव ठाकरे ठाणे आणि कल्याणमध्ये प्रचारसभा घेत आहेत. कल्याणमध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध शिउबाठाच्या वैशाली दरेकर राणे अशी लढत आहे. तर, ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध शिउबाठाचे राजन विचारे अशी लढत आहे.
देशभरात २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.