Saturday, February 15, 2025 04:58:30 AM

राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक

राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक

मुंबई, ५ मे २०२४, प्रतिनिधी: उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील विविध प्रकल्पांतील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील पाणीसाठा २८ टक्क्यांवर आला. त्यामुळे सध्या २,३४४ गावे व ५,७४९ वाड्यांना २,९५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, उन्हाचा तडाखा असाच राहिल्यास पाणीपुरवठ्याची स्थिती आणखी चिंताजनक होणार आहे.

त्यापैकी सर्वांत गंभीर परिस्थिती पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आहे. मागील वर्षी कमी झालेले पाऊसमान व यंदाच्या वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील धरणांनी तळ गाठला आहे. सध्या धरणांमध्ये २८.०६ टक्के पाणीसाठा असून तो गेल्यावर्षी ४०.२८ टक्के होता. यात सर्वाधिक धरणे ही छ.संभागीनगर विभागात असून ९२० धरणे असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३५ टक्क्यांनी घटला आहे. गेल्यावर्षी येथे ४६.७९ टक्के पाणीसाठा होता.