Thursday, December 05, 2024 06:55:44 AM

Claims on Ladaki Baheen Yojana by MVA leaders
मविआच्या नेत्यांकडून लाडकी बहीण योजनेवर दावेदारी

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील फलक लावला आहे.

मविआच्या नेत्यांकडून लाडकी बहीण योजनेवर दावेदारी

 

पुणे : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार राज्यातील ६० ते ६५ वर्षाखालील सर्व महिलांना प्रति महिना १ हजार ५०० रूपये अर्थसहाय्य करणार आहे. १ जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित होणार आहे. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील फलक लावला आहे. या फलकाद्वारे त्यांनी योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती दिली आहे. एका बाजूला विरोधी पक्षांतील नेत्यांकडून या योजनेवर टीका केली जात आहे. दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील आमदार सरकारी योजनेचा लाभ देण्याच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.

आमदार धंगेकरांनी लावलेल्या फलकाची सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांनी लावलेल्या फलकावर ना मुख्यमंत्र्यांचा फोटो दिसत आहेत. ना सरकारचा उल्लेख पाहायला मिळत आहे. याउलट फलकावर स्वत:चा व पत्नीचा फोटो आहे. तर फलकाच्या वरील बाजूस राहुल गांधी, शरद पवार आणि उध्दव ठाकरे या महाविकास आघाडीतील नेत्यांचा फोटो लावण्यात आला आहे. म्हणजेच काय तर मविआच्या नेत्यांकडून लाडकी बहीण योजनेवर दावेदारी करण्याचा प्रयत्न होत आहे. योजना महायुतीची आहे आणि ती पळवण्याचे काम मविआने केले आहे. एकीकडे सरकारवर टीका करणारे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारच्या योजनेचा फलक लावल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

मविआकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे 'बहिणींनो, मविआकडे अर्ज देऊ नका' असे आवाहन राज्यभरातील सर्व महिलांना भाजपाकडून करण्यात येत आहे.  

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo