नवी दिल्ली : सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेत निवडून आलेले एकमेव खासदार आहेत तर राज्यसभेत पक्षाचे प्रफुल्ल पटेल खासदार आहेत. या दोन खासदारांपैकी एकाला केंद्रात मंत्री करण्याबाबत चर्चा सुरू आहे. पण प्रफुल्ल पटेल की सुनील तटकरे या दोघांपैकी कोणाला संधी द्यावी हा पेच राष्ट्रवादीपुढे निर्माण झाला आहे. यामुळे भाजपाने अजित पवारांना तोडगा काढा आणि कळवा असा निरोप पाठवला आहे. जोपर्यंत हा तोडगा निघत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीकडील कोणालाही मंत्रिपदाची शपथ द्यायची नाही, असा निर्णय झाला असल्याचे समजते.