Thursday, December 05, 2024 06:21:26 AM

मणिपूरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला

मणिपूरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला

नवी दिल्ली, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये मागच्या वर्षभरापासून कुकी आणि मैतेई समुदायामध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष काही केल्या थांबत नाही आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यानही मणिपूरमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. दरम्यान, कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मणिपूर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास कुकी उग्रवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला. हे दोन्ही जवान मणिपूरमधील विष्णूपूर जिल्ह्यातील नारानसेना परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएपच्या १२८ व्या बटालियनमधील होते.

याआधी दंगेखोरांनी कांगपोकपी, उखरूल आणि इंफाळ पूर्वमधील ट्रायजंक्शन जिल्ह्यात एकमेकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात कुकी समुदायातील २ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर थौबल जिल्ह्यातील हेईरोक आणि तेंगनौपाल दरम्यान दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर इंफाळ पूर्व जिल्ह्यातील मोइरंगपूरेल मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात कांगपोकपी आणि इंफाळ पूर्व या दोन्हीकडील सशस्त्र उग्रवादी सहभागी होते.

        

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo