Sunday, May 19, 2024 08:52:20 AM

'यूटीएस अॅप'द्वारे तिकिटांसाठीची बाह्य मर्यादा रद्द

यूटीएस अॅपद्वारे तिकिटांसाठीची बाह्य मर्यादा रद्द

मुंबई, प्रतिनिधी, २४ एप्रिल २०२४ : रेल्वे मंडळाने मंगळवारी यूटीएस अॅपद्वारे पेपरलेस तिकीट काढण्यासाठी बाह्य मर्यादेचे बंधन रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकल आणि एक्स्प्रेसचा प्रवासी कोणत्याही ठिकाणाहून पेपरलेस तिकिटे काढू शकणार आहे. हा मोठा बदल झाल्याने रेल्वे प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.यूटीएस अॅपद्वारे दररोज लाखो प्रवासी रेल्वेची तिकिटे काढत असून प्रवासी वर्गाचा सकारात्मक प्रतिसाद यूटीएस अॅपबाबत आहे. मात्र, यूटीएस अॅपद्वारे लोकलचे तिकीट काढताना रेल्वे परिसरापासून २० किमी आणि रेल्वे गाडीचे तिकीट काढताना ५० किमी अंतरअंतर्गत मयदिच्या नियमांत बदल नाही !यूटीएस अॅपद्वारे लोकल, रेल्वेगाडीचे तिकीट काढण्याची सोय आहे. तसेच फलाट तिकीटदेखील काढू शकतो. तथापि, अंतर्गत मर्यादच्या नियमांत कोणताही बदल केलेला नाही. फक्त रेल्वे स्थानक परिसराबाहेर तिकिटे कढण्याची परवानगी आहे. गाडीत किंवा स्थानकात असताना, तकीट काढता येणार नाही.राखण्याची मर्यादा होती. परंतु आता प्रवाशांच्या सोयी वाढवण्याच्या आणि तिकीट प्रक्रिया व्यवस्थित करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.


सम्बन्धित सामग्री