मुंबई, १८ मे २०२४, प्रतिनिधी : गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, जोगेश्वरी आणि दादर येथील श्रमिक बेघरांच्या ठिकाणी मतदार नोंदणी करून घेण्यात आल्यानंतर आता त्यांना मतदार ओळखपत्र मिळाले आहे. त्यामुळे १४१ श्रमिक बेघर पहिल्यांदाच २० मे रोजी मतदान करणार आहेत. सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी संस्थेने या शेवटच्या घटकांपर्यंत मतदार नोंदणीसाठीचे सहकार्य केले होते. यंदा निवडणूक आयोगाने राबवलेल्या मतदान नोंदणी अभियानामुळे अनेक श्रमिक बेघरांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे ते मतदार म्हणून भूमिका बजावणार असल्याचे सीपीडी संस्थेचे समन्वयक जगदीश पाटणकर यांनी सांगितले.