Sunday, May 19, 2024 07:51:09 AM

'मेट्रो लाइन-३'चा पहिला टप्पा मे अखेरपर्यंत सुरु होण्यीची शक्यता

मेट्रो लाइन-३चा पहिला टप्पा मे अखेरपर्यंत सुरु होण्यीची शक्यता

मुंबई, प्रतिनिधी, दि. २४ एप्रिल २०२४ : मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याची अंतिम चाचणी सुरू झाली आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत मेट्रो-3 चा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो-3 आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पर्यंत सुरू होईल. मेट्रो 3 हा कुलाबा-वांद्रे-सिप्झ असा 33.5 किमी लांबीचा भूमिगत कॉरिडॉर आहे.यापूर्वी मेट्रोच्या वेगाचे मूल्यांकन करण्यासाठी रिकाम्या डब्यांसह ड्राय रन घेण्यात आली होती. रिकाम्या डब्यांच्या यशस्वी चाचणीनंतर आता आठ डब्यांच्या मेट्रो ट्रेनच्या प्रत्येक डब्यात बारीक खडी भरलेल्या पिशव्या ठेऊन त्यांची चाचणी होणार आहे. या ‘लोडेड ट्रायल’चा उद्देश प्रवाशांचा भार हाताळण्यात या गाड्या किती चांगली कामगिरी करतात याची खात्री करणे हा आहे.पुढील आठवड्यात ही ट्रायल सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो-3 च्या या चाचण्या सरळ आणि वक्र मार्गांवर घेण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी ही सेवा सुरू करण्यापूर्वी मेट्रो प्रशासन कोणतीही अनियमितता होणार नाही याची खबरदारी घेत आहे. मुंबई मेट्रो-3 प्रकल्प 96 टक्के पूर्ण झाला आहे. उर्वरित काम हे स्टेशन सुशोभीकरण आणि इतर किरकोळ कामे आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मते, भूमिगत मेट्रो सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे 260 सेवा सुरू होतील. त्यामुळे सुमारे 17 लाख प्रवासी यातून प्रवास करणार आहेत.

                 

सम्बन्धित सामग्री