सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात सक्रिय असणारा आणि अनेक सेलिब्रिटींसोबत पार्टींमध्ये आढळाणारा ओरी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. यावेळेस त्याच नाव ड्रग्ज प्रकरण घेतल गेल आहे. अलिकडेच, मुंबई पोलिसांच्या अॅटिकॉरिक्स सेलने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दुबईस्थित भागीदार सलीम डोला याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला. ज्यात 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणासंदर्भात अमली पदार्थ विरोधी कक्षाने आणि मुंबई पोलिसांनी ओरीला समन्स बजावले आहे.
मुंबई पोलिसांनी 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेखला अटक केली असता त्यांच्यासोबत केलेल्या चौकशीदरम्यान या ड्रग्ज प्रकरणात ओरीचे नावही सामील असल्याचं समोर आलं आहे. तसेच तो भारतात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित करतो आणि त्यांना ड्रग्ज पुरवतो. त्याचसोबत नोरा फतेही, श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, झीशान सिद्दीकी, ओरी उर्फ ओरहान, अब्बास मस्तान, लोका आणि अनेक सेलिब्रिटींचा देखील सहभाग असल्याच समोर आलं आहे.
यापुर्वी यात नोरा फतेहीचे नाव देखील घेण्यात आल होत. त्यावेळेस तिने म्हटले की, "मी पार्टींमध्ये जात नाही. मी सतत काम करत असते. मी वर्काहोलिक आहे. माझे वैयक्तिक आयुष्य नाही. मी अशा लोकांशी स्वतःला जोडत नाही. जेव्हा मी सुट्टीवर असते तेव्हा मी दुबईतील माझ्या घरी आणि समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत वेळ घालवणे पसंत करते. तुम्ही जे काही वाचता त्यावर विश्वास ठेवू नका. माझे नाव हळूहळू सोपे लक्ष्य बनत आहे असे दिसते. पण यावेळी मी ते होऊ देणार नाही; हे आधी एकदा घडले आहे".
"तुम्ही लोकांनी मला खराब करण्याचा प्रयत्न केला, खोटे बोललात, पण काहीही काम झाले नाही. लोक माझ्यावर टीका करत असताना, त्यांच्या क्लिकबेटसाठी माझे नाव कलंकित करत असताना मी शांतपणे पाहत होतो. माझे फोटो आणि नाव या प्रकरणापासून दूर ठेवा, ज्याचा माझा काहीही संबंध नाही. याची मोठी किंमत मोजावी लागेल"
दरम्यान पोलिसांनी ओरीला 20 नोव्हेंबरला अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मित्र सलीम डोला हा ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. हे सिंडिकेट देशभरातील सात-आठ राज्यांना मेफेड्रोन (एमसीएटी), म्याऊ म्याऊ आणि आइस सारख्या औषधांचा पुरवठा करत होते आणि मोठ्या प्रमाणात परदेशातही तस्करी करत होते. या ड्रग्ज तस्करीतून मिळणारे पैसे हवाला आणि रिअल इस्टेटद्वारे लाँडरिंग केले जात असल्याचा ईडीला संशय आहे.