पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथे हादरवणारी घटना समोर आली आहे. एका दहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 60 वर्षीय झुंबर सिताराम खोमणे याच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार पोस्को bns 4आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपी झुंबर खोमणे याने तिला फूस लावून घराच्या पाठीमागील शेतातील सिताफळ बागेत नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तत्काळ जेजुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. तसेच जेजुरी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी झुंबर खोमणे यास बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलिसांकडून सुरू आहे. तर या घृणास्पद प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.