Saturday, June 15, 2024 04:26:19 PM

Naxalite
दंतेवाडात १५ नक्षलवाद्यांना अटक

छत्तीसगडमधील दंतेवाडात सुरक्षा पथकाने पंधरा नक्षलवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये सात महिला नक्षलवादी आहेत.

दंतेवाडात १५ नक्षलवाद्यांना अटक

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडात सुरक्षा पथकाने पंधरा नक्षलवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये सात महिला नक्षलवादी आहेत. सुरक्षा पथकाने अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली. गीदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमलनार गावाजवळ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या नक्षलवाद्यांची चौकशी सुरू आहे. याआधी सोमवारी सुरक्षा पथकांनी बीजापूरमध्ये वेगवेगळ्या भागात तीन नक्षलवाद्यांना अटक केली. या नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. 


सम्बन्धित सामग्री