गोंदियात 18 मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोटर सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाने पर्दाफाश केला.

गोंदियात 18 मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल जप्त
Bike Theft Gang

गोंदियामधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मोटर सायकल चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. फुलप्रूफ प्लॅनिंग करत गोंदिया जिल्ह्याच्या विविध पोलीस स्टेशन हद्दीतून मोटार सायकल चोरी करून आपण पकडले जाणार नाही, अशा या 4 चोरांचा गैरसमज पोलिसांनी मोडकळीस आणला.

जिल्ह्याच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकली चोरी झाल्याच्या गुन्ह्याची नोंद होती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाने छडा लावत गोंदिया येथील राहुल लिल्हारे व त्याच्या 3 मित्रांना अटक केली. त्यांच्याकडून 18 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ज्यांची बाजार किंमत 8 लाख रुपये असून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंबंधीची पुढील कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशन गोंदिया यांना देण्यात आली आहे.

हेही वाचा – चिमुकलीचे शब्द ऐकून शेजारीही हादरले! ते मला चटके देतात अन्…; डॉक्टर दाम्पत्याचा संतापजनक कारनामा

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number