22 वर्षीय तरुण शेतकऱ्याचं टोकाचे पाऊल; अखेर तेच कारण ठरलं….; अख्खा महाराष्ट्र हळहळला

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांसमोर पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, संकटांपुढे काही शेतकरी हतबल होत आहेत

22 वर्षीय तरुण शेतकऱ्याचं टोकाचे पाऊल; अखेर तेच कारण ठरलं….; अख्खा महाराष्ट्र हळहळला

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांसमोर पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, संकटांपुढे काही शेतकरी हतबल होत आहेत. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यातूनच एका तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ही घटना सिल्लोड तालुक्यातील गव्हाली येथे घडली आहे. विठ्ठल दिनकर शिंदे (वय 22) या तरुण शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गावर काळाचा घाला! इंदापूरजवळ कार उलटून एक ठार; 5 जण गंभीर जखमी

यंदा पावसाने दगा दिल्याने उभी पिके वाळून गेली, त्यामुळे बियाणे, खते आणि मशागतीचा खर्चही निघाला नाही. त्यातच आजारी आईच्या उपचारांची जबाबदारी आणि डोक्यावरील वाढत्या कर्जामुळे ते प्रचंड तणावात आणि चिंतेत होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

घटनेनंतर त्यांना तात्काळ सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वडोदबाजार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number