Fraud Case: 5 किलो सोनं, महागड्या गाड्या अन् घरं; लग्नाचं आमिष दाखवून NRI तरुणाला ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने लावला करोडोंचा चुना

ग्लॅमरस दुनियेतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर 9 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

Fraud Case: 5 किलो सोनं, महागड्या गाड्या अन् घरं; लग्नाचं आमिष दाखवून NRI तरुणाला ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने लावला करोडोंचा चुना

Fraud Case: ग्लॅमरस दुनियेतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर 9 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. 'बिग बॉस तेलुगू' फेम अभिनेत्री आशू रेड्डी हिने एका लंडनस्थित एनआरआय (NRI) सॉफ्टवेअर इंजिनिअरला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 9.35 कोटी रुपयांना लुबाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. हैदराबादमधील सेंट्रल क्राईम स्टेशनमध्ये (CCS) याप्रकरणी औपचारिक तक्रार नोंदवण्यात आली आहे.

प्रेमाचा बनाव अन् कोट्यवधींच्या भेटी
परदेशात राहणाऱ्या सत्यनारायण नावाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा आणि अभिनेत्री आशू रेड्डी यांची 2018 मध्ये भेट झाली होती. या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. अभिनेत्रीने संबंधित तरुणाशी लग्न करण्याचे वचन दिले होते. या वचनावर विश्वास ठेवून पीडित तरुणाने अभिनेत्रीला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्या. तक्रारीत नमूद केल्यानुसार, अभिनेत्रीने तरुणाकडून 5 किलो सोने, अनेक आलिशान गाड्या, महागडे फ्लॅट्स आणि अपार्टमेंट्स अशा मौल्यवान वस्तू खरेदी करून घेतल्या. या सर्व व्यवहारांची एकूण किंमत 9.35 कोटींच्या घरात आहे.

बहिणीनेही लावला 50 लाखांचा चुना
या प्रकरणात केवळ आशू रेड्डीच नाही, तर तिच्या बहिणीवरही फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. पीडित तरुणाकडून अभिनेत्रीच्या बहिणीने सुमारे 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र ही रक्कम तिने कधीच परत केली नसल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. आता लग्न करण्यास अभिनेत्रीने नकार दिल्याने, तिने केवळ पैशांसाठी हा प्रेमाचा बनाव रचला होता, असा गंभीर आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.

हेही वाचा –Shiv Thakare: ‘ड्रायव्हर सीटवर भगवा फेटा घातलेला दादा…’ मराठी माणसासाठी शिव ठाकरे मैदानात; स्वतःची कार सेवेत उतरवली

अभिनेत्रीचे प्रत्युत्तर आणि पोलिसांची भूमिका
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आशू रेड्डीने सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे. तिने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून, आपल्याविरुद्ध खोटा प्रचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, हैदराबाद पोलिसांनी या गुन्ह्याची दखल घेऊन तपास सुरू केला आहे. "प्राथमिक माहितीनुसार दोघेही काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे समजते, मात्र मोठ्या आर्थिक व्यवहारांमुळे हे प्रकरण आता गुंतागुंतीचे झाले आहे," असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number