Washim Crime : वाशिममधील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने खळबळ, आता तपासात नवे ट्विस्ट; सख्ख्या भावावर संशयाची सुई

13 जून रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांना विहिरीत टाकल्यानंतर स्वतः पतीनेही आत्महत्या केली होती.

Washim Crime :  वाशिममधील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने खळबळ, आता तपासात नवे ट्विस्ट; सख्ख्या भावावर संशयाची सुई

13 जून रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांना विहिरीत टाकल्यानंतर स्वतः पतीनेही आत्महत्या केली होती. यावेळी संतोष तुकाराम बकाल (वय 35) यांचा मृतदेह महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता, तर पत्नी वर्षा उर्फ इंद्रायणी बकाल (वय 28) आणि मुलगी जान्हवी बकाल (वय 7) आणि मुलगा सोहम बकाल (वय 5) या दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले होते.

या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणात मृतक संतोष बकाल यांच्या सख्ख्या भावासह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शिरपूर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा- Solapur Accident : सोलापूरच्या भीषण अपघाताने राज्य हादरले! सरकारकडून इतक्या लाखांची मदत जाहीर

तिवळी येथील या हृदयद्रावक घटनेनंतर मृतक संतोष बकाल यांचे मेहुणे तथा वर्षा बकाल यांचे भाऊ सुधाकर सुभाष इंगोले यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, संतोष बकाल यांच्या नावावरील शेती, जमिनीतील हिस्सा आणि पैशांच्या व्यवहारावरून अनेक वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. या वादातून संतोष बकाल यांना सातत्याने मानसिक त्रास देण्यात येत होता. त्यांच्यासोबत शिवीगाळ, अपमान आणि दबाव टाकण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या तक्रारीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी महादेव उर्फ महादा तुकाराम बकाल, उर्मिला महादा बकाल, पंकज महादा बकाल आणि भगवान उर्फ सावन महादा बकाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अर्थात बीएनएसच्या कलम 108 आणि 3(5) अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी महादेव बकाल याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number