Nagpur Crime : आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; शिपायाचं शाळेतील दोन विद्यार्थ्यांसोबत अश्लील कृत्य

नागपूरच्या काटोल तालुक्यातील एका आश्रम शाळेतील शिपायाने आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Nagpur Crime : आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; शिपायाचं शाळेतील दोन विद्यार्थ्यांसोबत अश्लील कृत्य

नागपूरच्या काटोल तालुक्यातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या काटोल तालुक्यातील एका आश्रम शाळेतील शिपायाने आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान संबंधित आरोपी शिपायावर कोंढाळी पोलिसात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आश्रमशाळेतील 44 वर्षीय शिपाई राजेश मालापुरे असं आरोपीच नाव असून त्याच्यावर दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण तर एका विद्यार्थ्यासोबत गैरकृत्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो, बाल न्याय अधिनियम आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- Nagpur Crime : प्रेमकहाणीचा भयंकर अंत! अचानक रात्री हॉटेलच्या 302 रूममधून तरुणीच्या किंकाळ्या, दार उघडताच समोर दिसलं…; बंद रूममध्ये नेमकं काय घडलं?

तसेच या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा महिला व बाल संरक्षण विभागाच्या पथकाने आश्रमशाळेत जाऊन चौकशी सुरू केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. आश्रमशाळेतील सर्व 260 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आश्रमशाळेतील वातावरण आणि इतर काही गैरप्रकार आहेत का? याचीही पथकाकडून तपासणी केली जात आहे. दरम्यान काटोत उपविभागीय पोलीस अधिकारी पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number