Georgia Shooting : अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीचे क्रूर कृत्य; तीन नातेवाईक आणि पत्नीवर झाडल्या गोळ्या

या भीषण गोळीबाराच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या तीन चिमुकल्यांनी कपाटात लपून स्वतःचा जीव वाचवला आणि पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.<br/>

Georgia Shooting : अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीचे क्रूर कृत्य; तीन नातेवाईक आणि पत्नीवर झाडल्या गोळ्या

Georgia Shooting : अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने घरगुती वादातून आपल्या पत्नीसह तीन नातेवाईकांना गोळ्या झाडून संपवलं. या भीषण गोळीबाराच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या तीन चिमुकल्यांनी कपाटात लपून स्वतःचा जीव वाचवला आणि पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

नेमकी घटना काय?

शुक्रवारी पहाटे 2:30 च्या सुमारास ब्रूक आयव्ही कोर्ट परिसरात ही घटना घडली. 51 वर्षीय विजय कुमार याने रागाच्या भरात अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात चार प्रौढांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. मृतांमध्ये आरोपीची पत्नी मीनू डोगरा (43), गौरव कुमार (33), निधी चंदर (37) आणि हरीश चंदर (38) यांचा समावेश आहे.

मुलांच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव

गोळीबार सुरू झाला तेव्हा विजय कुमारची तीन मुले घरातच होती. जीवाच्या भीतीने ही मुले तातडीने एका कपाटात लपून बसली. तेथूनच एका मुलाने '911' या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुले सुरक्षित होती, त्यांना नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा – KRK In Firing Case : त्या गोळीबारप्रकरणात केआरकेचा हात; मुंबई पोलिसांनी केली केआरकेला अटक

आरोपीला अटक आणि गुन्हे दाखल

घटनेनंतर आरोपी विजय कुमार पसार झाला होता, मात्र पोलिसांनी शोध मोहीम राबवून त्याला जवळच्याच एका जंगली भागातून अटक केली. आरोपीवर हत्येचे चार गुन्हे, गंभीर हल्ल्याचे चार गुन्हे आणि मुलांवर क्रूरता केल्याचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारतीय वाणिज्य दूतावासाकडून मदत

अटलांटा येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दूतावासाने 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, "कौटुंबिक वादातून घडलेली ही घटना अत्यंत दुःखद आहे. बळींमध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश असून पीडित कुटुंबाला सर्व शक्य मदत पुरवली जात आहे." 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number