Tuesday, November 18, 2025 10:30:28 PM

Navi Mumbai: धक्कादायक! जन्मदात्या आईनेचं दहा वर्षीय मुलीला वेश्याव्यवसायात ढकललं

दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनंच मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

navi mumbai धक्कादायक जन्मदात्या आईनेचं दहा वर्षीय मुलीला वेश्याव्यवसायात ढकललं

नवी मुंबई: दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनंच मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खारघरमधील कोपरा भागातील हा प्रकार आहे. व्यक्ती घरभाडं आणि रेशन देत असल्याने आईने असं कृत्य केलं आहे. गेल्या 2 वर्षांपासून मुलीवर अत्याचार होत आहेत. फारुख शेख या व्यक्तीकडून मुलीचा छळ होत आहे.  

10 वर्षीय अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत तळोजामधून मुलीला आरोपी फारुख शेखच्या घरातून ताब्यात घेतले. पीडित मुलीची आई नुरबी अन्सारीला आरोपी फारुख शेखने घर भाड्याने घेण्यासाठी अडीच लाख रुपये रोख दिले आणि  रेशन भरून देत होता. या बदल्यात ती अल्पवयीन मुलीला गेल्या 2 वर्षांपासून फारुख शेखच्या घरी वेश्याव्यवसायासाठी पाठवत होती. आरोपी अल्पवयीन मुलीला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. 

एएचटीयूच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "पीडित अल्पवयीन आहे हे पूर्ण माहिती असूनही, आरोपीने तिचे दोन वर्षांपर्यंत शोषण केले.  तसेच 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी त्याने तिला दारू पाजली आणि तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला. आईला पूर्ण माहिती असूनही तिने पैशासाठी ही व्यवस्था सुरू ठेवली."

हेही वाचा : Phaltan Doctor case : अखेर फलटण डॉक्टर प्रकरणी SIT स्थापन, या महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तपास होणार

छाप्यात भयानक घराचा पर्दाफाश

30 ऑक्टोबर रोजी कोपरगावची एक महिला तिच्या 10 वर्षांच्या मुलीला तळोजा येथील एका वृद्ध पुरूषाकडे रात्री पाठवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, एएचटीयू पथकांने शेखच्या घरावर छापा टाकला. यानंतर त्यांना मुलगी आरोपीसोबत जखमी अवस्थेत आढळली. फ्लॅटच्या आत, अधिकाऱ्यांना सेक्स टॉय, व्हायग्राच्या गोळ्या आणि रिकाम्या दारूच्या बाटल्या सापडल्या. जेव्हा तो तिच्यावर अत्याचार करत असे तेव्हा तिला दारू पाजण्यास भाग पाडले जात होते," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. धक्कादायक म्हणजे, शेख विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. विशेष म्हणजे पीडितेच्या वयाची त्याला एक नात आहे. ते सर्वजण अमेरिकेत राहतात. आरोपीच्या कुटुंबियांना अटकेची माहिती देण्यात आली आहे.

गुरुवारी भारतीय न्याय संहिताच्या कलमांखाली आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पीडितेला बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली असलेल्या बालगृहात हलवण्यात आले आहे, जिथे समुपदेशन आणि मदत सुरू झाली आहे. 


सम्बन्धित सामग्री