Crime News: माणुसकीला काळिमा! किरकोळ वादातून महिलेच्या चेहऱ्याला काळे फासून काढली धिंड; दोन आरोपी गजाआड

एका 28 वर्षीय महिलेच्या पतीसोबत असलेल्या वादाचा सूड उगवण्यासाठी शेजाऱ्याने महिलेच्या चेहऱ्याला काळे फासून तिची भररस्त्यात धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Crime News: माणुसकीला काळिमा! किरकोळ वादातून महिलेच्या चेहऱ्याला काळे फासून काढली धिंड; दोन आरोपी गजाआड

Crime News:  झारखंडची राजधानी राँचीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 28 वर्षीय महिलेच्या पतीसोबत असलेल्या वादाचा सूड उगवण्यासाठी शेजाऱ्याने महिलेच्या चेहऱ्याला काळे फासून तिची भररस्त्यात धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी राँची पोलिसांनी तत्परता दाखवत एका महिलेसह दोन आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

दुचाकीच्या वादातून सुडाचा प्रवास
ही घटना रविवारी राँचीच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘भाभानगर’ वसाहतीत घडली. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि मुख्य आरोपी पंकज सिंग हे एकाच वसाहतीत भाड्याने राहणारे शेजारी आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी पीडित महिलेच्या पतीने पंकजची दुचाकी त्याला कोणतीही पूर्वसूचना न देता नेली होती. पंकजने याला ‘चोरी’ समजून वाद घातला. महिलेने आपला पती दुचाकी घेऊन गेल्याचे मान्य केले होते आणि ती लवकरच परत करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, पंकजने संतापून या वादाचे पर्यवसान अत्यंत खालच्या पातळीवरील कृत्यात केले.

भररस्त्यात महिलेची मानहानी आणि पोलिसांची कारवाई
दरम्यान, रविवारी आरोपी पंकज सिंग याने आपली मैत्रिण संतना कुमारी हिच्या मदतीने पीडित महिलेला गाठले. दोघांनी मिळून महिलेला पकडून तिच्या चेहऱ्याला काळे फासले आणि सर्वांसमक्ष तिची धिंड काढली. या कृत्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुलदीप कुमार आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि महिलेची सुटका केली. पोलिसांनी पंकज सिंग आणि संतना कुमारी या दोघांनाही तात्काळ बेड्या ठोकल्या.

हेही वाचा – Talwar Baba : अंगात संचार येतो, हातात तलवार घेवून भक्तांना भुलथापा मारतो; भोंदू खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा समोर

आरोपींची कबुली आणि पुढील तपास
पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. “जर दुचाकी चोरीला गेली होती, तर पोलिसांत तक्रार का केली नाही?” या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आरोपींना देता आले नाही. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर ‘भारतीय न्याय संहितेच्या’ (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरून एका महिलेचा असा सार्वजनिक अपमान केल्याबद्दल स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number