Nerul Crime : दोनदा कार रिव्हर्स घेतली आणि अंगावर…; पार्किंगच्या क्षुल्लक वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला चिरडलं

गाडी पार्क करण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून अज्ञात तरुणांनी 33 वर्षीय तरुणाच्या अंगावर क्रेटा कार दोनदा रिव्हर्स चालवून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना नेरुळमधील मिनीमहल हॉटेलसमोर घडली आहे.

Nerul Crime : दोनदा कार रिव्हर्स घेतली आणि अंगावर…; पार्किंगच्या क्षुल्लक वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला चिरडलं

गाडी पार्क करण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून अज्ञात तरुणांनी 33 वर्षीय तरुणाच्या अंगावर क्रेटा कार दोनदा रिव्हर्स चालवून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना नेरुळमधील मिनीमहल हॉटेलसमोर घडली आहे. या घटनेतील फरार चौकडीने यावेळी दोघा तरुणावर हॉकी स्टिकने हल्ला करून पलायन केले असून नेरूळ पोलिसांनी या चौकडीचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा- Seemanchal Express Tragedy News: आईला लागली झोप अन् 9 महिन्यांचं बाळ खिडकीतून…धावत्या एक्स्प्रेसमधील खरारक प्रकार

या घटनेतील तक्रारदार आशुतोष मोरजकर आशुतोष व त्याचा मित्र मुबिन हे दोघे शिरवणे येथील मिनीमहल हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी मुबिन याने हॉटेल समोर पार्क केलेल्या दुचाकीला क्रेटा कार मधील तरुण लाथ मारत होते. याचा जाब विचारायला आशुतोष आणि मुबीन गेले असता जोरदार भांडण सुरु झाले.

या दरम्यान मध्यस्थी करत भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या रणजितसिंग शेरगिल याच्या अंगावरचं क्रेटा कार घालत त्याची हत्या केलेय. यानंतर आरोपी पसार झाले मात्र काही वेळाने पुन्हा येत आशुतोष वर हल्ला चढवला आणि पुन्हा फरार झाले. याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number