मुंबई : टायगर श्रॉफवरील गोळीबारापूर्वी अभिनेता आमिर खान कथित शूटर्सचे मूळ लक्ष्य. टायगर श्रॉफपूर्वी आमिर खानला लक्ष्य करण्याचा कथित कट. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी सप्टेंबरमध्ये आमिर खानच्या घराजवळ 3 वेळा रेकी. आमिर खानपर्यंत पोहोचणे कठीण वाटल्याने कथित कटात टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय. 20 सप्टेंबरला हरियाणातून आलेले कथित आरोपी मुंबईत दाखल झाले. आरोपी जवळपास एक महिना मुंबईत राहून विविध ठिकाणी फिरत होते. सप्टेंबरमध्ये आमिर खानच्या निवासस्थानाच्या परिसरात किमान 3 वेळा रेकी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आरोपी वांद्रे पूर्व परिसरातील लॉजमध्ये राहिले होते. आमिर खान शूटिंगसाठी बाहेर असायचा किंवा अनेक दिवस घराबाहेर पडत नसे,त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाल्याचा दावा. आरोपींनी कथितपणे टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला. टायगर श्रॉफ जुहूतील पुष्पा नरसी पार्कमध्ये दर रविवारी फुटबॉल खेळण्यासाठी येत असल्याची माहिती आरोपींनी मिळवली होती. आमिर खानला जुलैमध्ये कथित बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याचा आणि या प्रकरणाचा त्या धमकीशी संबंध असण्याचा पोलिसांना संशय आहे.
हेही वाचा : अमरावती जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचालींना वेग; लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार?