Ahmedabad Crime: आई-बापच ठरले मारेकरी! मुलाच्या हव्यासापोटी चिमुकल्या मुली नकोश्या झाल्या; खासगी डायरीत नवस फेडण्याचा उल्लेख अन्…

अहमदाबादमध्ये दोन मुलींच्या मृत्यूच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे.

Ahmedabad Crime: आई-बापच ठरले मारेकरी! मुलाच्या हव्यासापोटी चिमुकल्या मुली नकोश्या झाल्या; खासगी डायरीत नवस फेडण्याचा उल्लेख अन्…

Ahmedabad Crime: अहमदाबाद मधील चांदखेडा परिसरात दोन चिमुकल्या मुलींच्या मृत्यूच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले असून, या प्रकरणात आई-वडीलच मारेकरी असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला डोशाच्या पिठामुळे विषबाधा झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र तपासात हा बनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रजापती कुटुंबातील दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र त्याच पिठाचा वापर इतरांनीही केला असून त्यांना कोणतीही तक्रार नसल्याने पोलिसांनी या प्रकरणाकडे संशयाने पाहण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: रेडी-टू-ईट 'डोसा'ने घेतला दोन चिमुरड्यांचा जीव? आई-वडीलही मृत्यूच्या दारात, सत्य समोर

तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांनी संपूर्ण प्रकरणाचे चित्रच बदलले. या घटनेतून वाचलेल्या आई-वडिलांच्या वैद्यकीय तपासणीत काही रासायनिक घटक आढळले. यामुळे मुलींच्या मृत्यूमागे विषबाधेचा बनाव रचण्यात आल्याचा संशय अधिक बळावला.

घरातून सापडलेली एक खासगी डायरी या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरली. या डायरीतील नोंदींमध्ये मुलगा होण्याची तीव्र इच्छा व्यक्त करण्यात आली होती. तसेच, मुलगा झाल्यास मंदिरात जाऊन नवस फेडण्याचा उल्लेखही आढळून आला. या नोंदींमुळे मुलींबद्दलचा तिरस्कार आणि मानसिकता उघड झाली आहे.

याशिवाय घरातून कीटकनाशकाचे अवशेषही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासात हे स्पष्ट झाले की, मुलींचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित पद्धतीने घडवून आणलेला प्रकार आहे. विषबाधेचा बनाव करून संपूर्ण घटना अपघाती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

हेही वाचा: कशासाठी एवढा अट्टाहास? डेस्टिनेशन वेडिंगसाठी खर्चाचा घाट; अवाढव्य रकमेची जुळवाजुळव होऊ शकली नाही.. तणावात उचललं टोकाचं पाऊल

या प्रकरणात आई-वडीलच मारेकरी असल्याचे स्पष्ट होत असून, मुलाच्या हव्यासापोटी त्यांनी आपल्या चिमुकल्या मुलींचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number