अकोल्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कर्जफेडीच्या चिंतेत विहिरीत उडी

दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोरील अडचणींची मालिका सुरू असतानाच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

अकोल्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कर्जफेडीच्या चिंतेत विहिरीत उडी

अकोला, सुरेंद्र आकोडे: दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोरील अडचणींची मालिका सुरू असतानाच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील चिखली-कादवी येथे एका शेतकऱ्याने जीवन संपवल्याची दुःखद घटना घडली आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली-कादवी येथील 45 वर्षीय दिगंबर अरुणराव वाघ यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिगंबर वाघ यांच्याकडे 5 एकर शेती होती. त्यांच्यावर सहकारी बँकेचे सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज होते आणि कर्जाची परतफेड होत नसल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – अहिल्यानगरमध्ये नवरात्रोत्सवाच्या तयारीला गालबोट! मंडप कोसळून चिमुकला आणि वृद्ध गंभीर जखमी

या घटनेची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणातील नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number