Punjab Crime: लग्न करण्यासाठी भारतात आली अन् गमावला जीव, पेटत्या कोळशांवर मृतदेह आणि..

अमेरिकन महिलेला लग्नाचे अमिष दाखवून भारतात बोलावले आणि तिची हत्या करण्यात आली. महिलेला बेसबॉलच्या बॅटने बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेचाा मृत्यू झाला.

Punjab Crime: लग्न करण्यासाठी भारतात आली अन् गमावला जीव, पेटत्या कोळशांवर मृतदेह आणि..

चंदिगढ: अमेरिकन महिलेला लग्नाचे अमिष दाखवून भारतात बोलावले आणि तिची हत्या करण्यात आली. महिलेला बेसबॉलच्या बॅटने बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेचाा मृत्यू झाला. यानंतर महिलेचा मृतदेह पेटत्या कोळशांवर ठेवण्यात आला. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर शिल्लक राहिलेली हाडं नाल्यात फेकून देण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रुपिंदर कौर पंधेर नावाची महिला 12 जुलै रोजी अमेरिकेतून भारतात आली. भारतातील डेहलोतील रायपूर परिसरात तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. त्याला ब्रिटनहून हत्येची सुपारी देण्यात आली होती. हत्येची सुपारी देणाऱ्या सूत्रधाराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपिंदर कौर यांचा दोनदा घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांची ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यावसायिक चरणजीत सिंग याच्यासोबत मैत्री झाली. चरणजीत सिंगने रुपिंदरलाा लग्नाचे वचन दिले होते. चरणजीतसोबत लग्न करण्यासाठी रुपिंदर भारतात आल्या. 

हेही वाचा: Lodha Developers Fraud: 85 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक राजेंद्र लोढाला अटक

भारतात आलेल्या रुपिंदर यांचा मोबाईल अनेक दिवसांपासून बंद होता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना संशय आला. कमल कौर खैरा यांनी सर्व प्रथम नवी दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासाशी संपर्क साधला. त्यांनी स्थानिक पोलिसांवर रुपिंदर यांचा शोध घेण्यासाठी दबाव टाकला. रुपिंदर यांनी चरणजीत यांच्याकडे सतत लग्नासाठी घाई लावली होती. पण चरणजीतने लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या रुपिंदरने त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि त्याचा साथीदार सुखजीत सिंह उर्फ सोनूच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे चरणजीतनं ब्रिटनमधून रुपिंदर यांच्या हत्येचा कट रचला आणि सुपारी देऊन त्यांचा काटा काढला.

या प्रकरणात पोलीस पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रुपिंदर कौर यांच्या मृतदेहाचे अवशेष, हाडांचा सापळा याचा शोध सुरु आहे. हत्या करणाऱ्या सुखजीत सिंह उर्फ सोनूने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे. तो रायपूरचा रहिवाशी होता. रुपिंदर कौरकडून लाखो रुपये उकळण्याचा कट रचण्यात आलेला होता. रुपिंदर कौरने आरोपी सोनू आणि त्याच्या भावाच्या बँक खात्यात मोठी रक्कम पाठवली होती. सोनूने त्याचा साथीदार चरणजीतच्या मदतीनं हत्येचा कट रचला आणि तो यशस्वी केला. या प्रकरणात अन्य आरोपींच्या अटकेची शक्यता आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number