Thursday, June 11, 2026 10:18:58 PM

Chhatrapati Sambhajinagar Crime : दोन तासांपूर्वी हसत-खेळत फोटो काढला, मित्रांसोबतचा फोटो स्टेटसला ठेवला; नंतर मित्रांनीच केला विश्वासघात

छत्रपती संभाजीनगर शहरातून मैत्रीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मित्रांनी एका तरुणाचा निर्घून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

chhatrapati sambhajinagar crime  दोन तासांपूर्वी हसत-खेळत फोटो काढला मित्रांसोबतचा फोटो स्टेटसला ठेवला नंतर मित्रांनीच केला विश्वासघात

छत्रपती संभाजीनगर शहरातून मैत्रीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्या मित्रांसोबत दोन तासांपूर्वी हसून-खेळून फोटो काढला आणि सोशल मीडियावर स्टेटस ठेवले त्याच मित्रांनी एका तरुणाचा निर्घून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारगिल मैदानावर ही घटना घडली आहे. रोहित उर्फ करण रवी म्हस्के या हत्या झालेला तरुणाचे नाव आहे. मृत रोहित म्हस्के हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता.

त्याचे काही महिन्यांपूर्वी त्याच्याच काही मित्रांसोबत खटके उडाले होते. काल रात्री या मित्रांनी रोहितला सोबत घेतले, गप्पा मारल्या आणि एकत्र फोटोही काढले. रोहितने मोठ्या विश्वासाने या मित्रांसोबतचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टेटस म्हणून ठेवला. मात्र या स्टेटसच्या अवघ्या दोन तासानंतर जुन्या वादाचा वचपा काढत संशयित आरोपींनी रोहितवर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली.

तर पुंडलिक नगर पोलिसांनी या प्रकरणी वेगाने चक्रे फिरवत कृष्णा उदावंत, सागर घुले, बादशहा शेख, प्रफुल्ल पाखरे आणि शोएब शेख या पाच जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील सहावा आरोपी अक्षय पडूळ हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.ज्या पुंडलिक नगर परिसरात काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती, तिथेच आता ही हत्येची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
 


सम्बन्धित सामग्री