Friday, February 13, 2026 12:26:20 AM

Mumbai Crime : अंधेरीत सोसायटीवर अंदाधुंद गोळीबार; आरोपी फरार, पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात रविवारी रात्री गोळीबाराची घटना घडली.

mumbai crime  अंधेरीत सोसायटीवर अंदाधुंद गोळीबार आरोपी फरार पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात रविवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. लोखंडवाला बॅक रोड परिसरामध्ये अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गोळीबार करणारे तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. तर पोलिसांत यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : Indonesia Plane Crash: इंडोनेशियात भीषण विमान अपघात! सुलावेसीत उड्डाणादरम्यान रडारवरून गायब झालेलं विमान कोसळलं; 11 जण बेपत्ता

गोळीबाराची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. ओशिवरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून आणि प्रत्यक्षदर्शींची बोलून घटनेची माहिती घेत आहेत. पोलिसांना घटनास्थळावर दोन बुलेट सापडल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार केलेल्या इमारतीला घेरलं. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. गोळीबार करणारे तरुण कोण होते, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर तरुणांनी गोळीबार का केला, याचेही कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. या गोळीबारामागे कोणत्या गँगचा हात आहे का, हे देखील तपासले जात आहेत.


सम्बन्धित सामग्री