पुण्यात पुन्हा संतापजनक घटना! महानगरपालिका कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ‘वडिलांना मारून…

पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाची तक्रार दाखल करण्यात आली.
पुण्यात पुन्हा संतापजनक घटना! महानगरपालिका कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ‘वडिलांना मारून…

पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाची तक्रार दाखल करण्यात आली. 22 सप्टेंबरला डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे 12 वर्षीय मुलीवर लैगिक प्रकार घडला, संबंधित मुलीला आणि तिच्या आईला विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेण्यात आले. आईच्या फिर्यादीवरून तत्काळ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?
या अल्पवयीन मुलीला युरिन इन्फेक्शनचा त्रास झाला म्हणून ती तिच्या आई सोबत डॉक्टरकडे गेली. यावेळी तपासणी मध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. ही बातमी पोलिसांना देण्यात आली असून तात्काळ आई व मुलीला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. पोलिसांच्या तपासादरम्यान पीडित मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कबुली दिली. तिच्या जबाबानुसार हा अतिप्रसंग 12 सप्टेंबर दिवशी तिच्यावर ओढवला. आरोपीने पीडितेला तिच्या वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे पीडितेने या अत्याचाराची तक्रार कोणाकडे न करता शांत राहिली, मात्र डॉक्टरांच्या तपासणीत ह्या गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. आरोपी (52 वर्षीय) महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सफाई कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – आई पाणी भरण्यासाठी घरी गेली, मैत्रिणीने गोड बोलून नेलं, तोंड दाबलं अन्.., 2 नराधमांनी आळीपाळीने केला अत्याचार; जळगाव हादरलं

त्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी म्हणून चार्जशीट पाठवून कोर्टात ही केस फास्ट ट्रॅक कोर्ट ट्रायल चालवून कठोर शिक्षा देण्याची, मागणी पोलिसांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version