Friday, December 05, 2025 01:38:49 AM

Viral Video: "भैय्या, मत करो प्लिज... " रॅपिडो ड्रायव्हरचं महिलेसोबत लज्जास्पद कृत्य; व्हिडिओ व्हायरल

बेंगळुरूत तरुणीवर रॅपीडो चालकाकडून छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोप. व्हिडिओद्वारे तरुणीने घटना मांडल्याने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत.

viral video quotभैय्या मत करो प्लिज quot  रॅपिडो ड्रायव्हरचं महिलेसोबत लज्जास्पद कृत्य व्हिडिओ व्हायरल

बेंगळुरू: बेंगळुरू शहरात एका तरुणीने केलेला गंभीर आरोप सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. एका बाईक टॅक्सी अ‍ॅपमधून तिने प्रवास बुक केला होता, आणि त्या प्रवासादरम्यान चालकाने तिच्या पायांना हात लावण्याचा प्रयत्न केला, असा धक्कादायक आरोप तिने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उघडपणे समोर आला आहे.

ही घटना 6 नोव्हेंबरच्या संध्याकाळच्या वेळेस शहराच्या मध्यभागात घडल्याचं सांगितलं जातं. संबंधित तरुणीने हा संपूर्ण प्रसंग एका व्हिडिओ आणि पोस्टच्या माध्यमातून समाजमाध्यमावर मांडला. तिने लिहिलं; हे इतकं अचानक घडलं की काही क्षण तिला काय झालं हेच समजलं नाही. भीतीने तिचा मेंदूच काही काळ बंद पडल्यासारखा झाला.
 

तरुणीच्या म्हणण्यानुसार, ती शहरातील एका प्रसिद्ध रस्त्यावरून आपल्या निवासस्थानाकडे जात होती. प्रवास सुरू झाल्यानंतर थोड्याच मिनिटांत चालकाने मागे हात घेऊन तिच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. हे इतकं अनपेक्षित होतं की काही क्षण ती थबकलीच. त्यानंतर तिने चालकाला थेट इशारा दिला “काय करता, नका करू!” पण तिच्या म्हणण्यानुसार चालकाने त्यावेळीही आपलं वर्तन थांबवलं नाही.

या परिसरात ती नवी असल्याने, अचानक रस्त्यात उतरायचं तिला धाडस होत नव्हतं. जागेची ओळख नसल्याने तिने शांतपणे गंतव्यस्थान गाठण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण प्रवासभर ती भीतीत होती. घरी पोहोचल्यावर मात्र तिची अवस्था अधिकच बिघडली  हातापायाला शहारे, डोळ्यातून पाणी येणं, असं तिला जाणवलं.

तेथे उपस्थित असलेल्या एका स्थानिक व्यक्तीने तिची अवस्था ओळखली आणि तिला काय झालं ते विचारलं. त्यानंतर त्याने ड्रायव्हरलाही थेट प्रश्न विचारून जाब मागितला. चालकाने तेथे माफी मागितली, पण निघताना पुन्हा त्याने संशयास्पद नजरेने पाहिल्याचा तरुणीचा दावा आहे. यामुळे तिची भीती आणखी वाढली.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे; तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर प्राथमिक चौकशीत तथ्यांची खात्री झाल्यावर संबंधित चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला अटकही करण्यात आली आहे.

या घटनेनंतर बाईक टॅक्सी चालकांची व्हेरिफिकेशन प्रक्रिया अजून सतर्कतेने करावी, प्रत्येक चालकाचं बॅकग्राऊंड नीट तपासलं जावं, अशी मोठ्या प्रमाणात मागणी सुरू झाली आहे.


 


सम्बन्धित सामग्री